Gurucharitra Adhyay 14

श्री गुरूचरित्र अध्याय 14 | Gurucharitra Adhyay 14 Pdf

गुरु चरित्र – अध्याय 14

अध्याय 14 मध्ये गुरु श्रीदत्तांची महत्त्वपूर्ण कथा, भक्ती आणि शिकवण दिलेली आहे. येथे तुम्ही संपूर्ण श्लोक व अर्थ वाचू शकता.

श्री गुरूचरित्र – अध्याय 14 विषयी माहिती

गुरु चरित्र – अध्याय 14 मध्ये गुरु श्रीदत्तांच्या विविध लीला, भक्तीची महती आणि आध्यात्मिक शिकवण दिलेली आहे. हा अध्याय भक्तांसाठी मार्गदर्शक आहे आणि जीवनातील संकटे सोप्या मार्गाने पार करण्याचे मार्ग दाखवतो.

या अध्यायात गुरुंच्या कृपेने भक्तांना मिळणारे लाभ, श्रद्धा वाढवण्याचे मार्ग, तसेच जीवनात येणाऱ्या अडचणींवर मात करण्याचे उपाय स्पष्ट केले आहेत. अध्यायातील कथा आणि शिकवण भक्तांना सतत प्रेरणा देतात.

येथे आपण संपूर्ण श्लोक व त्यांचे मराठी अर्थ वाचू शकता. तसेच PDF स्वरूपात डाउनलोड करून नंतर अभ्यास करता येईल. हे अध्याय भक्तांना ध्यान, पूजा, आणि जीवनातील आध्यात्मिक विकासासाठी मार्गदर्शन करते.

अध्याय 14 मध्ये गुरु श्रीदत्तांच्या लीला, भक्तांचा अनुभव, आणि समर्पणाची महती यांचा समावेश आहे. हा अध्याय प्रत्येक भक्तासाठी अध्यात्मिक शिक्षणाचा खजिना आहे, जो भक्तांच्या जीवनात सुख, शांती, आणि समृद्धी आणतो.

गुरूचरित्र अध्याय 14 | Gurucharitra Adhyay 14

नामधारक शिष्य देखा । विनवी सिद्धासी कवतुका ।

प्रश्न करी अतिविशेखा । एकचित्तें परियेसा ॥ १ ॥

जय जया योगीश्वरा । सिद्धमूर्ति ज्ञानसागरा ।

पुढील चरित्र विस्तारा । ज्ञान होय आम्हांसी ॥ २ ॥

उदरव्यथेच्या ब्राह्मणासी । प्रसन्न जाहले कृपेसीं ।

पुढें कथा वर्तली कैसी । विस्तारावें आम्हांप्रति ॥ ३ ॥

ऐकोनि शिष्याचें वचन । संतोष करी सिद्ध आपण ।

गुरूचरित्र कामधेनु जाण । सांगता जाहला विस्तारें ॥ ४ ॥

ऐक शिष्या शिखामणि । भिक्षा केली ज्याचे भुवनीं ।

तयावरी संतोषोनि । प्रसन्न जाहले परियेसा ॥ ५ ॥

गुरूभक्तीचा प्रकारू । पूर्ण जाणे तो द्विजवरू ।

पूजा केली विचित्रु । म्हणोनि आनंद परियेसा ॥ ६ ॥

तया सायंदेव द्विजासी । श्रीगुरू बोलती संतोषीं ।

भक्त हो रे वंशोवंश । माझी प्रीति तुजवरी ॥ ७ ॥

ऐकोनि श्रीगुरूचें वचन । सायंदेव विप्र करी नमन ।

माथा ठेवून चरणीं । न्यासिता झाला पुन: पुन्हा ॥ ८ ॥

जय जया जगद्गुरू । त्रयमूर्तीचा अवतारू ।

अविद्यामाया दिससी नरू । वेदां अगोचर तुझी महिमा ॥ ९ ॥

विश्वव्यापक तूंचि होसी । ब्रह्मा-विष्णू- व्योमकेशी ।

धरिला वेष तूं मानुषी । भक्तजन तारावया ॥ १० ॥

तुझी महिमा वर्णावयासी । शक्ती कैंची आम्हांसी ।

मागेन एक आतां तुम्हांसी । तें कृपा करणें गुरूमुर्ति ॥ ११ ॥

माझे वंशपारंपरीं । भक्ती द्यावी निर्धारीं ।

इह सौख्य पुत्रपौत्रीं । उपरी द्यावी सद्गति ॥ १२ ॥

ऐसी विनंति करूनी । पुनरपि विनवी करूणावचनीं ।

सेवा करितो द्वारयवनीं । महाशूरक्रूर असे ॥ १३ ॥

प्रतिसंवत्सरीं ब्राह्मणासी । घात करितो जीवेसीं ।

याचि कारणें आम्हांसी । बोलावीतसे मज आजि ॥ १४ ॥

जातां तया जवळी आपण । निश्चयें घेईल माझा प्राण ।

भेटी जाहली तुमचे चरण । मरण कैंचें आपणासी ॥ १५ ॥

संतोषोनि श्रीगुरुमूर्ति । अभयंकर आपुले हातीं ।

विप्रमस्तकीं ठेविती । चिंता न करीं म्हणोनियां ॥ १६ ॥

भय सांडूनि तुवां जावें । क्रूर यवना भेटावें ।

संतोषोनि प्रियभावें । पुनरपि पाठवील आम्हांपाशी ॥ १७ ॥

जंववरी तूं परतोनि येसी । असों आम्ही भरंवसीं ।

तुवां आलिया संतोषीं । जाऊं आम्ही येथोनि ॥ १८ ॥

निजभक्त आमुचा तूं होसी । पारंपरवंशोवंशीं ।

अखिलाभीष्ट तूं पावसी । वाढेल संतति तुझी बहुत ॥ १९ ॥

तुझे वंशपारंपरीं । सुखें नांदती पुत्रपौत्रीं ।

अखंड लक्ष्मी तयां घरीं । निरोगी होती शतायुषी ॥ २० ॥

ऐसा वर लाधोन । निघे सायंदेव ब्राह्मण ।

जेथें होता तो यवन । गेला त्वरित तयाजवळी ॥ २१ ॥

कालांतक यम जैसा । यवन दुष्ट परियेसा ।

ब्राह्मणातें पाहतां कैसा । ज्वालारूप होता जाहला ॥ २२ ॥

विमुख होऊनि गृहांत । गेला यवन कोपत ।

विप्र जाहला भयचकित । मनीं श्रीगुरूसी ध्यातसे ॥ २३ ॥

कोप आलिया ओळंबयासी । केवीं स्पर्शे अग्नीसी ।

श्रीगुरुकृपा होय ज्यासी । काय करील क्रूर दुष्ट ॥ २४ ॥

गरूडाचिया पिलियांसी । सर्प तो कवणेपरी ग्रासी ।

तैसें तया ब्राह्मणासी । असे कृपा श्रीगुरूची ॥ २५ ॥

कां एखादे सिंहासी । ऐरावत केवीं ग्रासी ।

श्रीगुरूकृपा होय ज्यासी । कलिकाळाचें भय नाहीं ॥ २६ ॥

ज्याचे हृदयीं श्रीगुरूस्मरण । त्यासी कैंचें भय दारुण ।

काळमृत्यु न बाधे जाण । अपमृत्यु काय करी ॥ २७ ॥

ज्यासि नाहीं मृत्यूचें भय । त्यासी यवन असे तो काय ।

श्रीगुरूकृपा ज्यासी होय । यमाचें मुख्य भय नाहीं ॥ २८ ॥

ऐसेपरी तो यवन । अंत:पुरांत जाऊन ।

सुषुप्ति केली भ्रमित होऊन । शरीरस्मरण त्यासी नाहीं ॥ २९ ॥

हृदयज्वाळा होय त्यासी । जागृत होवोनि परियेसीं ।

प्राणांतक व्यथेसीं । कष्टतसे तये वेळीं ॥ ३० ॥

स्मरण असें नसे कांहीं । म्हणे शस्त्रें मारितो घाई ।

छेदन करितो अवेव पाहीं । विप्र एक आपणासी ॥ ३१ ॥

स्मरण जाहलें तये वेळीं I धांवत गेला ब्राह्मणजवळी ।

लोळतसे चरणकमळीं । म्हणे स्वामी तूंचि माझा ॥ ३२ ॥

येथें पाचारिलें कवणीं । जावें त्वरित परतोनि ।

वस्त्रे भूषणें देवोनि । निरोप देतो तये वेळीं ॥ ३३ ॥

संतोषोनि द्विजवर । आला ग्रामा वेगवक्त्र ।

गंगातीरीं असे वासर । श्रीगुरूचे चरणदर्शना ॥ ३४ ॥

देखोनियां श्रीगुरूसी । नमन करी तो भोवसी ।

स्तोत्र करी बहुवसीं । सांगे करी वृत्तान्त आद्यंत ॥ ३५ ॥

संतोषोनि श्रीगुरुमूर्ति । तया द्विजा आश्वासिती ।

दक्षिण देशा जाउं म्हणती । स्थान-स्थान तीर्थयात्रे ॥ ३६ ॥

ऐकोनि श्रीगुरूचें वचन । विनवीतसे कर जोडून ।

न विसंबें आतां तुमचे चरण । आपण येईन समागमें ॥ ३७ ॥

तुमचे चरणाविणें देखा । राहों न शके क्षण एका ।

संसारसागर तारका । तूंचि देखा कृपासिंधू ॥ ३८ ॥

उद्धरावया सगरांसी । गंगा आणिली भूमीसी ।

तैसें स्वामीं आम्हांसी । दर्शन दिधलें आपुलें ॥ ३९ ॥

भक्तवत्सल तुझी ख्याति । आम्हां सोडणें काय नीति ।

सवें येऊं निश्चितीं । म्हणोनि चरणीं लागला ॥ ४० ॥

येणेंपरी श्रीगुरूसी । विनवी विप्र भावेसीं ।

संतोषोनि विनयेसीं । श्रीगुरू म्हणती तये वेळीं ॥ ४१ ॥

कारण असे आम्हां जाणें । तीर्थे असती दक्षिणे ।

पुनरपि तुम्हां दर्शन देणें । संवत्सरीं पंचदशीं ॥ ४२ ॥

आम्ही तुमचे गांवासमीपत । वास करूं हें निश्चित ।

कलत्र पुत्र इष्ट भ्रात । मिळोनि भेटा तुम्ही आम्हां ॥ ४३ ॥

न करा चिंता असाल सुखें । सकळ अरिष्टें गेली दुःखें ।

म्हणोनि हस्त ठेविती मस्तकें । भाक देती तये वेळीं ॥ ४४ ॥

ऐसेपरी संतोषोनि । श्रीगुरू निघाले तेथोनि ।

जेथें असे आरोग्यभवानी । वैजनाथ महाक्षेत्र ॥ ४५ ॥

समस्त शिष्यांसमवेत । श्रीगुरू आले तीर्थे पहात ।

प्रख्यात असे वैजनाथ । तेथें राहिले गुप्तरूपें ॥ ४६ ॥

नामधारक विनवी सिद्धासी । काय कारण गुप्त व्हावयासी ।

होते शिष्य बहुवसी । त्यांसी कोठें ठेविलें ॥ ४७ ॥

गंगाधराचा नंदनु । सांगे गुरूचरित्र कामधेनु ।

सिद्धमुनि विस्तारून । सांगे नामकरणीस ॥ ४८ ॥

पुढील कथेचा विस्तारू । सांगतां विचित्र अपारू ।

मन करूनि एकाग्रु । ऐका श्रोते सकळिक हो ॥ ४९ ॥

इति श्रीगुरूचरित्रामृते परमकथा कल्पतरौ
श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे
क्रूरयवनशासनं सायंदेवावरप्रदानं नाम चतुर्दशोऽध्याः

॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु श्रीगुरूदेवदत्त ॥

श्रीगुरूचरित्र अध्याय 14 चे लाभ

  • गुरुभक्तीमध्ये वाढ: हा अध्याय वाचल्याने गुरूविषयी श्रद्धा आणि भक्ती वाढते.
  • संकटांमधून मुक्ती: जीवनातील अडचणी आणि संकटांपासून सुटका मिळते.
  • सकारात्मक विचार आणि मानसिक शांती: मन शांत, समाधानी आणि स्थिर राहते.
  • आध्यात्मिक प्रगती: आत्मज्ञान आणि मोक्षाच्या मार्गावर मार्ग प्रशस्त होतो.
  • संपत्ती आणि सुख-समृद्धी: आर्थिक आणि कुटुंबिय जीवनात संतुलन आणि समृद्धी येते.
  • आत्मविश्वास आणि धैर्य: कठीण परिस्थितीत धैर्य आणि साहस वाढते.
  • मनोकामना पूर्ती: धार्मिक आणि नैतिक इच्छा पूर्ण होतात.
  • रोग आणि शारीरिक दुर्बलता कमी: आरोग्य समस्यांमध्ये आराम मिळतो.
  • चांगले मित्र आणि उत्तम समाज: धर्मात्म मित्र आणि समाजात संबंध दृढ होतात.
  • पापांचा नाश: नियमित पठण केल्यास अज्ञान आणि पाप दूर होतात.

Gurucharitra Adhyay 14 Pdf Download

श्रीगुरूचरित्र – PDF डाउनलोड

संपूर्ण श्रीगुरूचरित्र अध्याय १४ आता PDF स्वरूपात उपलब्ध आहे. तुम्ही PDF डाउनलोड करून **संपूर्ण स्तोत्र** सोबत वाचू शकता, ठेवू शकता किंवा प्रिंट करू शकता.

येथे तुम्ही PDF संबंधित माहिती, मार्गदर्शन, किंवा इतर महत्त्वाचे नोट्स देखील देऊ शकता.

PDF डाउनलोड करा
Guru Charitra 14 Adhyay -Shri Guru Charitra Adhyay 14th

Scroll to Top